मोठी बातमी : दहावीचा निकाल जाहीर! कोकण विभागाची बाजी
मोठी बातमी : दहावीचा निकाल जाहीर! कोकण विभागाची बाजी "हा" विभाग तळाशी , पहा टक्केवारी
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकताच दहावीच्या निकालाची काही वैशिष्ट्ये पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत.

यावेळी त्यांनी विभागीय टक्केवारी देखील सांगितली आहे. यंदा राज्यातील दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के लागला आहे, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८% लागला आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी असे हे नऊ विभागीय मंडळ आहेत.

नऊ विभागीय मंडळांची उत्तीर्णतेची टक्केवारी-
कोकण – 98.82%
कोल्हापूर – 96.87%
मुंबई – 95.84%
पुणे – 94.81%
नाशिक – 93.04%
अमरावती – 92.95%
छत्रपती संभाजीनगर – 92.82%
लातूर – 92.77%
नागपूर – 90.78%

नेहमीप्रमाणे दहावी बोर्डाच्या परीक्षेतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 टक्के असून मुलांची टक्केवारी ही 92.31 टक्के इतकी आहे.

या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group