दहावीच्या परीक्षा लवकरच घेतल्या जाणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च या कालावधीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतात. यावर्षीदेखील फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. परीक्षेसाठी अवघे काही महिने उरले आहेत. दरम्यान परीक्षेसंदर्भात बोर्डाने मोठा निर्णय घेतलाय.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उचच माध्यमिक मंडळामार्फत घेण्याच्या येणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्काह तुम्ही अर्ज भरु शकतात.
तुम्हाला १७ नोव्हेंबरनंतर मुदतवाढ मिळणार नाहीये, असं मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या दहावीच्या मुलांनी अजूनही परीक्षेसाठी अर्ज भरला नाही त्यांनी लवकरात लवकर भरून टाकावा.
दहावीच्या परीक्षेत कॉपी होण्याची शक्यता असते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कॉपी करु नये म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता परीक्षा केंद्रात प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपी करता येणार नाही. तरीही कॉपी करताना पकडले गेले तर संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई केली जाईल.