राज्यातील 642 कोर्सना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पाल्यांच्या मुलींना अर्धी फी माफ होती. आता ती संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे. तसा जीआरही काढण्यात आलेला असून महाविद्यालयाकडून फी मागण्यात आली तर त्या संबंधित संस्थांची संलग्नता तत्काळ रद्द करण्यात येईल. मुलींसाठी लवकर टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार असून महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी दहा जणांची टॅक्स फोर्स तयार करण्यात आल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंमळनेर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
900 कोटींची तरतूद करून शंभर टक्के फी माफ
राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्राच्या भूमिपूजन करण्यासाठी अंमळनेर येथे सोमवार (दि.5) रोजी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक भागात शिक्षणाबद्दल मुलींमध्ये आनंद व उत्साह आहे. तसेच माझी लाडकी बहीण योजेनेवरुन आणि मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त या युवतींनी ओवाळणी करून राखी बांधली आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील 642 कोर्सेला आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पाल्यांच्या मुलींना अर्धी फी भरावी लागत होती. आता ती संपूर्ण फी माफ करण्यात आली असून शंभर टक्के फी शासनाकडून भरण्यात येणार आहे. पूर्वी राज्य शासन 900 कोटी खर्च करत होती. त्यात आणखी भर घालून अजून 900 कोटींची तरतूद करून शंभर टक्के फी माफी करण्यात आल्याचे व तसा जीआर काढण्यात आल्याचे नामदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे गावोगावी मुलींमध्ये समाधानाचे चित्र आहे.
घरात मुलगा व मुलगी दोघेजण शिक्षण घेत असल्यास आर्थिक परिस्थितीमुळे अडचणी आल्यास प्रथम मुलींच्या शिक्षणावर गदा येत होती. मात्र आता तसे होणार नाही, कारण आता फी माफीमुळे मुली ही पालकांशी समन्वय साधून लागलेल्या आहेत. फी माफी करणे हा आनंदाचा व कर्तव्याचा भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी मुलींसोबत संवाद साधत सांगितले की, तुमच्या अडचणीवर निबंध लिहून पाठवा. यावर मुलींनी सांगितले की, शाळेत जाण्यासाठी बस येत नाही. काहींना दहा दहा किलोमीटर पायी जावे लागते. यासाठी खाजगी पातळीवर रोजगार उपलब्ध करता येईल काय यासाठी शाळा महाविद्यालयांच्याशी विचार विनिमय सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
राज्यामध्ये काही महाविद्यालय फी आकारली जात आहे. याबाबत गेल्या चार-पाच दिवसापासून विचारविनिमय सुरू आहे. महाविद्यालय ट्युशन फी घेत नाही. इतर फी आपण माफ करू शकत नाही. त्यामुळे गॅदरिंग, जिमखाना, मॅक्झिन फी घेण्यात येत आहे तो फरक बघण्यात येईल. यासाठी दहा जणांची टॅक्स फोर्स तयार करण्यात आलेली आहे. महाविद्यालयाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच नियम व अटी पूर्ण करण्यासाठी, तपासणीसाठी प्रत्येक ठिकाणी एक व्यक्ती त्या त्या ठिकाणी जाणार आहे. जर यामध्ये त्रुटी दिसल्यास संबंधित संस्थांची संलग्नता तत्काळ रद्द करण्यात येईल. त्यासाठी कठोर नियम बजावून जी आर काढल्याचे नामदार चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.
संस्था चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्यासाठी राज्य सरकारने त्यांना विना मॉर्गेज, विना व्याजी बँकेचे कर्ज, शासनाच्या हमीपत्रावर देण्याचे सांगितले आहे. त्यासाठी संबंधित संस्थांना बँकेत नवीन खाते उघडण्याबाबतही सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे पैसे थेट त्या खात्यामध्ये टाकता येतील. असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मुलींसाठी टोल फ्री क्रमांक लवकरच सुरू करणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी यांनी यावेळी सांगितले