दहावीच्या विद्यार्थ्यांनो निकालासाठी तयार व्हा! निकालाच्या तारखेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिलीय अपडेट
दहावीच्या विद्यार्थ्यांनो निकालासाठी तयार व्हा! निकालाच्या तारखेसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिलीय अपडेट
img
DB
महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान आता दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढू लागली आहे. दहावीचा निकाल कधी ? असा प्रश्न विचारला जात आहे.  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली.  दरम्यान त्यांना यावेळी दहावी निकालासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. दहावीचा निकाल कधी? या प्रश्नावर बोलताना दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली.

निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या मदतीनेदेखील तुम्ही निकाल पाहू शकता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group