CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, CBSE च्या 'या' लिंकवर थेट पाहा रिझल्ट
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, CBSE च्या 'या' लिंकवर थेट पाहा रिझल्ट
img
Dipali Ghadwaje
मुंबई : अखेर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल सोमवारी 13 मे रोजी जाहीर केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाने सोमवारी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी सीबीएसई बोर्डाचा इयत्ता 10वीचा निकाल  cbse.gov.in किंवा cbseresults.nic या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल 2024 च्या निकालाची टक्केवारी 93.6% आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण परीक्षार्थींची संख्या 22,38,827 आहे. यापैकी 20,95,467 उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी, सुमारे 21 लाख विद्यार्थी CBSE बोर्ड परीक्षा 2024 ला बसले होते. ऑनलाइन मार्कशीट्स तात्पुरत्या असतील. विद्यार्थ्यांना मूळ मार्कशीट आणि प्रमाणपत्रे नंतर शाळा प्रशासनाकडून मिळेल.

सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 2024 ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. CBSE बोर्ड निकाल 2024 पाहण्यासाठी आणि मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी येथे दिलेली अधिकृतवेबसाइट्सची यादी पाहा. येथे तुम्ही निकाल पाहू शकता.  

CBSE निकाल 2024 ऑनलाइन कसा तपासायचा?

 स्टेप 1 : सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही results.cbse.nic.in किंवा www.cbse.nic.in यापैकी कोणत्याही एका वेबसाईटवर जात. 
स्टेप 2 : मुख्यपृष्ठावर गेल्यानेतर तिथे CBSE 10वी निकाल 2024 लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : रोल नंबर, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी सबमिट करा.
स्टेप 4 : आता तुम्हाला CBSE बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5 : तात्पुरती मार्कशीट डाउनलोड करु शकता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group