CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर
CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर
img
वैष्णवी सांगळे
CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. थंडी असलेल्या झोनमधील आणि थंडी नसलेल्या झोनसाठी परीक्षा वेगवेगळ्या तारखेला घेण्यात येणार आहेत. 


केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच सीबीएसई बोर्डाने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रासाठी प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीबीएसईची दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १७ फेब्रुवारी ते ४ एप्रिल २०२५ दरम्यान घेतल्या जाणार आहेत.

सीबीएसई बोर्डाने शाळांना विद्यार्थ्यांच्या यादी तयार करण्याचे आणि बाह्य परीक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईने हे देखील स्पष्ट केले की, दहावीसाठी अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच घेतले जाईल. प्रयोगशाळेच्या उपलब्धतेनुसार प्रॅक्टिकल परीक्षा अनेक सत्रांमध्ये घेतल्या जाऊ शकतात. एकदा गुण अपलोड झाल्यानंतर कोणतेही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

सीबीएसई बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, थंडी असलेल्या झोनमधील शाळा जानेवारीपूर्वी ६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण करू शकतात. थंडी नसलेल्या झोनसाठी या परीक्षा १ जानेवारी २०२६ पासून सुरू होतील. २९ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी आणि छठ हे सण संपत आहेत. त्यानंतरच सीबीएसईच्या परीक्षा सुरू होतील. सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून प्रॅक्टीकल परीक्षा, प्रोजेक्ट, इंटरनल असेसमेंट्स सुरू होतील.

सीबीएसईने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, दहावी आणि बारावीच्या सिद्धांत परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होतील. दहावीच्या बोर्ड परीक्षा ९ मार्च रोजी संपतील. तर बारावीच्या परीक्षा ९ एप्रिल रोजी संपतील. दहावीची परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतल्या जातील. तर बारावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:३० या वेळेत घेतल्या जातील. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
CBSE |
इतर बातम्या
Join Whatsapp Group