सीबीएसईच्या  10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
img
दैनिक भ्रमर
 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. दहावी बोर्डाची परीक्षा 18 मार्चला संपणार आहेत. तर बारावीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत सुरु असेल. सीबीएसईने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह शाळांना परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बोर्डाकडे सोपवण्यात सांगण्यात आलं आहे 

सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षेचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील आणि दुपारी १.३० वाजता संपतील. सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ दिवस आधी जाहीर केले आहे. तसेच जेईई मेन आणि नीट सारख्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्याचे बोर्डाने नोटीसमध्ये म्हटले आहे. एकाच विद्यार्थ्याने दिलेल्या दोन विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी होऊ नयेत, यासाठी ४० हजारांहून अधिक विषयांची सांगड घालून डेटशीट तयार करण्यात आली आहे. वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि पहिला पेपर इंग्रजीचा असेल. तर, बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीला आहे.

सीबीएसई इयत्ता १०वीचे वेळापत्रक २०२५

(कम्युनिकेटिव्ह / कम्युनिकेशन) भाषा व साहित्य - १५ फेब्रुवारी २०२५..

विज्ञान - २० फेब्रुवारी २०२५

संस्कृत - २२ फेब्रुवारी २०२५

सामाजिक विज्ञान - २५ फेब्रुवारी २०२५

हिंदी - २८ फेब्रुवारी २०२५

चित्रकला - १ मार्च २०२५

गणित मूलभूत / गणित मानक - १० मार्च २०२५

होम सायन्स - १३ मार्च २०२५

संगणक अनुप्रयोग, एआय, आयटी - १८ मार्च २०२५



सीबीएसई इयत्ता १२वी वेळापत्रक २०२५

उद्योजकता - १५ फेब्रुवारी २०२५

शारीरिक शिक्षण- १७ फेब्रुवारी २०२५

डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर- १८ फेब्रुवारी २०२५ 

फूड प्रॅक्टिस, डिझाइन - १९ फेब्रुवारी २०२५

टंकलेखन आणि संगणक अनुप्रयोग- २० फेब्रुवारी २०२५

भौतिकशास्त्र - २१ फेब्रुवारी २०२५

व्यवसाय अभ्यास, व्यवसाय प्रशासन- २२ फेब्रुवारी २०२५

भूगोल - २४ फेब्रुवारी २०२५

फ्रेंच, एआय, टॅक्सेशन, टेक्सटाइल डिझाइन- २५ फेब्रुवारी २०२५

रसायनशास्त्र - २७ फेब्रुवारी २०२५

सौंदर्य आणि वैद्यकीय निदान- २८ फेब्रुवारी २०२५ 

कॉस्ट अकाउंटिंग, लायब्ररी आणि इन्फो सायन्स- १ मार्च २०२५

रिटेल, लीगल स्टडीज- ३ मार्च २०२५

एनसीसी, बँकिंग- ४ मार्च २०२५

कृषी, मार्केटिंग - ५ मार्च २०२५

फॅशन स्टडीज - ६ मार्च २०२५

मास मीडिया- ७ मार्च २०२५

गणित, अप्लाइड मॅथ्स - ८ मार्च २०२५

पर्यटन - १० मार्च २०२५

इंग्रजी कोर आणि इलेक्टिव्ह - ११ मार्च २०२५

योग - १२ मार्च २०२५

वेब अनुप्रयोग- १३ मार्च २०२५

इतर बातम्या
Join Whatsapp Group