नाशिक माध्यमिक मंडळाच्या दहावीचा निकाल 95.28 टक्के;  चार टक्क्यांनी निकालात वाढ
नाशिक माध्यमिक मंडळाच्या दहावीचा निकाल 95.28 टक्के; चार टक्क्यांनी निकालात वाढ
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल 95. 18 टक्के लागला असून यावर्षी चार टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती  नाशिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. बी. चव्हाण आणि विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी दिली.

अध्यक्ष डॉ. बी. बी. चव्हाण आणि सचिव एम. एस. देसले यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार नाशिक विभागीय माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल हा यावर्षी 95.28 टक्के लागला आहे. मागील वर्षी हा निकाल 91.80 टक्के लागला होता. त्या तुलनेमध्ये यावर्षी हा निकाल सरासरी 4 टक्के जास्त लागला आहे. राज्यामध्ये 1 मार्च ते 26 मार्च2024 या कालावधीमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नाशिक विभागीय मंडळातून एक लाख 95 हजार 582 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले होते त्यापैकी एक लाख 86 हजार 352 विद्यार्थी हे परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यामधून एस. एस. सी. परीक्षेला 91 हजार 414 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 87 हजार 565 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्याचा निकाल हा 95.89 टक्के लागला आहे. धुळे जितल्ह्यामध्ये 28 हजार 41 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते. त्यापैकी 26,448 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. 

धुळे जिल्ह्याचा निकाल हा 94.31 टक्के लागला आहे. जळगाव जिल्ह्यात 55 हजार 585 विद्यार्थी हे परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 53 हजार 28 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. जळगाव जिल्ह्याचा निकाल हा 94.28 टक्के लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20  हजार 242 विद्यार्थी हे परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी 19हजार 309 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्याचा निकाल 95.29 टक्के लागलेला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group