NEET PG परीक्षेची तारीख फायनल ! प्रश्नपत्रिकेसाठी घेण्यात आला
NEET PG परीक्षेची तारीख फायनल ! प्रश्नपत्रिकेसाठी घेण्यात आला "हा" महत्वाचा निर्णय
img
Jayshri Rajesh
नीट पी जी परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास १३ दिवसांनी, राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा, पदव्युत्तरच्या सुधारित परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस आता ११ ऑगस्ट रोजी नीट पी जी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.

नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या अनियमिततेच्या आरोपांमुळे नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने सावधगिरीचा उपाय म्हणून २३ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली.

देशभरात सुमारे ५२,००० पदव्युत्तर जागांसाठी दरवर्षी सुमारे दोन लाख एमबीबीएस पदवीधर नीट पी जी परीक्षा देतात. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, परीक्षा रद्द करण्यात आली कारण मंत्रालयाला परीक्षा प्रक्रियेची मजबूती तपासायची होती आणि प्रक्रियेत कोणतीही असुरक्षितता नाही याची खात्री करायची होती.

मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेसंदर्भात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्रालयाची महत्वाची बैठक झाली. नीट परीक्षा एनटी ऐवजी आता एनव्हीईमार्फत घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आता ३ तास आधी प्रश्नपत्रिका तयार होणार असल्याची माहिती मिळत आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने नीट पी जी च्या नवीन परीक्षेच्या तारखेची नोटीस जारी केली आहे. ही परीक्षा आता ११ ऑगस्ट २०१४ रोजी घेतली जाणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group