नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना ! जन्मदात्या बापाकडून पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न
नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना ! जन्मदात्या बापाकडून पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न
img
Dipali Ghadwaje
धाराशिव  : धाराशिवमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीये. जन्म दिलेल्या बापानेच स्वतःच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाच समोर आलं आहे . 

मिळालेल्या माहितीनुसार , येडशी येथे रामलिंग घाट या घाटामध्ये छोट्या छोट्या तीन मुलांना स्वतःच्या बापानेच दुसऱ्याच्या घरी का जाता म्हणून पाण्यात बुडवून जिवे मारताना आयुष भारत डॉक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी व डॉ.अक्षय खुणे, संदेश लोखंडे, सौरभ भोसले, प्रमोद हेगडे, सुरज धावारे, करण राठोड यांच्या हा सर्व प्रकार लक्षात येताच येडशी मधील रामलिंग घाटात तात्काळ गाडी उभी केली व मुलांकडे धाव घेतली व त्या तीन मुलांचा जीव वाचवला. 

आयुष भारत डॉक्टर असोसिएशनची टीम एका हॉस्पिटलच्या उद्घाटना संदर्भात तेरे कडे जात असताना हा प्रकार घाटामध्ये दिसून आला त्या घाटामध्ये कोणीही थांबण्यास तयार नव्हते अशा घाटामध्ये आयुष भारत आरोग्य विभागाची पूर्ण टीम थांबून त्या मुलांचे प्राण वाचवले त्यावेळेस त्या मुलांचे वडील पळून जाण्याचा प्रयत्न करत होते , त्यावेळेस त्यांना आयुष भारत डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी पकडून ठेवले. 

दरम्यान घटनास्थळी अर्धा तास उलटून गेला तरीही पोलिसांची मदत न मिळाल्याने त्या तिन्ही मुलांना घेऊन आयुष भारतची टीम येडशी पोलीस ठाण्यामध्ये  पोहोचली व तेथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यामध्ये दिले व त्यांच्या वडिलांना ही पोलिसांच्या ताब्यात दिले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group