धाराशिव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शॉक लागल्याने बाप लेकासह दोन मजूर जागीच ठार झाले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील केशेगाव शिवारात शेतातील बोअरची दुरूस्ती करताना विजेचा धक्का लागल्याने शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत बाप लेकासह दोन मजूर दगावले. शेतातील विहिरीतील पाणबुडी मोटार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढताना क्रेनच्या महावितरणच्या विद्युत तारेचा धक्का बसल्याने ही दुर्घटना घडली.
क्रेनच्या साहाय्याने विद्युत प्रवाह खाली उतरला. त्यानंतर विजेचा जोरदार धक्का बसल्याने चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शेतकरी नागनाथ काशिनाथ साखरे (वय 52), रामलिंग नागनाथ साखरे (वय 25) तर मजुर काशिम फुलारी (वय 55) रत्न काशिम फुलारी (वय 16) यांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.