तुळजाभवानी दागिने चोरी प्रकरण ; छडा लावण्यासाठी पुरातत्व विभाग, गोल्ड एक्स्पर्टसची मदत
तुळजाभवानी दागिने चोरी प्रकरण ; छडा लावण्यासाठी पुरातत्व विभाग, गोल्ड एक्स्पर्टसची मदत
img
Dipali Ghadwaje
उस्मानाबाद : धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्थान राज्यातील एक मोठं मंदिर संस्थान पैकी एक आहे. रोज हजारो भाविक मंदिरात येत असतात. आई तुळजाभवानीचे प्राचीन आणि मौल्यवान अलंकार गायब प्रकरणानंतर श्री तुळजाभवानी मातेच्या मौल्यवान अलंकारांची पुरातत्व विभाग तज्ज्ञांकडून इनकॅमेरा तपासणी करण्यात येणार आहे.  देवीच्या प्राचीन व मौल्यवान अलंकारांच्या वजनात तफावत आढळून आल्याचे यापूर्वीच मंदीर समीतीच्या विविध समीत्यांच्या मोजणीत उघड झाले होते .या पार्श्वभूमीवर इन कॅमेरा तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्याचं नाही तर देशभरातील भाविक तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर संस्थानात मोठ्या प्रमाणात देणग्या देखील येतात. विशेष म्हणजे प्राचीन व मौल्यवान अलंकाराचे वजन कमी होण्याऐवजी काही अलंकाराच्या वजनात वाढ झाल्याच्या नोंदी आढळल्या होत्या. 

तुळजाभवानी मातेच्या प्राचीन आणि मौल्यवान दागिने गायब प्रकरणी महंतासह,सेवेकरी पलंगे व तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकावर 19 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा  दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख पुरातत्व विभाग व सोने तज्ज्ञांच्या मदतीने 1 ते 7 डब्यातील अलंकारांची तपासणी करणार आहेत.विविध रजिस्टर, फोटो अल्बमनुसार पाहणी करून नव्याने नोंदी घेतल्या जाणार आहेत. यासाठी पथक तुळजापूरात झाले दाखल होते. 

काय आहे नेमकं प्रकरण ? 

तुळजाभवानी मातेचे प्राचीन व मौल्यवान अलंकार गायब प्रकरणी आमदार महादेव जानकर यांनी सोमवार विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. श्री तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट व इतर दागिने गहाळ झाले होते. अनेकांची कुलदेवी असल्याने भाविक देवीला नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यावर अनेक भक्त श्रद्धेने कबुल केल्याप्रमाणे सोन्याचे दागीने आणि वस्तू देवीच्या चरणी अर्पण करतात. हे दागीणे मंदिर संस्थान नोंदणी करून सुरक्षीत ठेवते. या शिवाय देवीच्या अलंकारांचीसुद्ध जबाबदारी मंदिर प्रशासनाकडे आहे, मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहिती नुसार देवीच्या 27 अलंकारा पैकी 4 अलंकार गायब झाले तर 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्रावर देखील डल्ला मारण्यात आला.  
 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group