त्याने बॅग उचलताच झाला धमाका...! नेमकं काय घडलं? वाचा
त्याने बॅग उचलताच झाला धमाका...! नेमकं काय घडलं? वाचा
img
DB
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोलकातामध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे, या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याला एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यक्तीने रस्त्यावर पडलेली थैली उचलल्यानंतर हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ब्लोचमॅन सेंट आणि एसएन बॅनर्जी रोडवर एक थैली ठेवण्यात आलेली होती. तिथून जात असलेल्या एका कचरा वेचणाऱ्याने ती उचलण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्फोट झाला.

तलतला पोलीस स्फोट झालेल्या ठिकाणी पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव बपी दास (वय ५८) असे असून, त्याच्या एनआरएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

स्फोटानंतर पोलिसांनी परिसर बंद केला आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. बीडीडीएस टीमलाही बोलवण्यात आले. जो व्यक्ती या स्फोटात घायाळ झाला आहे, तो फूटपाथवरच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group