कोलकाता येथे एका डॉक्टर वर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली . दरम्यान या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे , या प्रकरणा विरोधात देशभरातून रोष ब्यक्त केला जात आहे . दरम्यान आता कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाचा सीबीआयकडून वेगानं तपास सुरू आहे. यात आरोपींची पॉलिग्राफ टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही टेस्ट असते ‘खरं जाणून घेण्याची’. यात मशीन माणसाची अंतर्गत हालचाल वाचते. त्यामुळे तोंडाने कितीही खोटं बोलत असेल तरी तिच्या मनात काय चाललंय हे कळतं. या टेस्ट विषयी एका एक्स्पर्ट प्राध्यापकांनी माहिती दिली आहे.
पॉलिग्राफ टेस्ट ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे, ज्यात व्यक्ती जेव्हा विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देते तेव्हा तिच्या शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रियांचं मोजमाप होतं. मोठमोठ्या गुन्ह्यांमध्ये ही टेस्ट केली जाते. अशी माहिती प्राध्यापकांनी दिली टेस्टच्या आधी टेस्ट देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तींचा एक प्री-टेस्ट इंटरव्ह्यू होतो. त्यात टेस्टच्या उद्देशांबाबत चर्चा होते. टेस्टदरम्यान नेमकं काय होईल याची त्या व्यक्तीला कल्पना दिली जाते. मग तिला एका खुर्चीत बसवून तिच्या शरिरावर काही सेन्सर लावतात. छाती, बोटं, हात अशा विविध अवयवांना हे सेन्सर कनेक्टेड असतात. या माध्यमातून व्यक्तीच्या अवयवांचे मापदंड रेकॉर्ड केले जातात. तिच्या हृदयाची धडधड, रक्तदाब, श्वसन दर, त्वचेची हालचाल, इत्यादी सर्व बाबी बारकाईनं रेकॉर्ड केल्या जातात.
एकदा या टेस्टचा सेटअप मांडला की, व्यक्तीला लागोपाठ प्रश्न विचारले जातात. जेव्हा ती प्रश्नांची उत्तरं खरी देते, तेव्हा तिची शारीरिक हालचाल स्थिर असते. जेव्हा ती खोटं बोलते तेव्हा तिच्या शारीरिक हालचालीत बदल होतात. मग मिळालेला डेटा एकत्र करून ऍनॅलिस्ट पुढचा तपास करतात.
तसेच, व्यक्ती खोटं बोलत असताना तिचा ताण आणि भीती पकडणं हे पॉलिग्राफ मशीनचं काम असतं. परंतु काही लोक तणावात खरंही बोलू शकतात किंवा खोटं बोलताना त्यांच्या शरिराची हालचाल स्थिर असू शकते. यातलाच अचूक फरक या मशीनमधून कळू शकतो. शिवाय यामुळेच कोर्टात या टेस्टचा निकाल हा एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. परंतु त्याआधारे पुढचा तपास केला जातो.
दरम्यान , कोलकाता प्रकरणातील कोलकाता येथील महिला ट्रेनी डॉक्टरची अत्याचार केल्यानंतर हत्या झाल्याने देश सुन्न आहे.या प्रकरणात सीबीआयने या प्रकरणातील आरोपी संदीप घोष सह सात लोकांची पॉलीग्राफ टेस्ट केली आहे. जेलमध्ये करमुख्य आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ टेस्टण्यात आली. तर माजी प्रिन्सिपल संदीप घोष आणि घटनेच्या दिवशी ड्यूटीवर हजर असलेले चार डॉक्टर आणि एका सिव्हील वॉलंटियर सह इतर सहा लोकांची सीबीआयच्या मुख्यालयात पॉलीग्राफ सत्य शोधन चाचणी घेण्यात आली.
पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली तेव्हा टेस्ट दरम्यान कोणते प्रश्न विचारले गेले ?
तुझं नाव संजय रॉय आहे का ?
2. तु कोलकातामध्ये राहायला आहेस का ?
3. तू घटनेच्या दिवशी रुग्णालयात होतास का ?
4. तुला मोटरसायकल चालवायला येते का ?
5. तू पीडीतेवर अत्याचार केलास का ?
6. तू पीडीतेला ठार मारले का ?
7. तू कधी खोटं बोललास का ?
8. टॉमेटोचा रंग लाल असतो का ?
9. तु पीडीतेला ओळखत होतास का ?
10. हा खून करताना तुझ्या सोबत कोण होते?
11. तु खून केल्यानंतर रुग्णालयातून पळून गेलास का ?
12. तू याआधी पीडीतेची छेड काढलीस का ?
13. तू पोर्न फिल्म पाहातोस का ?
14. तु डॉ. संदीप घोष याला ओळखतोस का ?
15. तू संदीप घोष यांना खून केल्याची माहीत दिली का?
16. तू पीडीतेची हत्या करण्यापूर्वी रेड लाइट एरियात जाऊन आला होतास का ?
17. सेमिनार हॉलमध्ये तुझ्या सोबत आणखी कोणी होते का ?
18. या घटनेबाबत तू कोणाला माहीती दिली होती का ?
19. सेमिनार हॉलमध्ये तुझे ब्लूटूथ तुटले होते का ?
20. तू सगळ्या प्रश्नांची उत्तरे खरी दिली आहेत का?
बातमीनूसार पॉलीग्राफी टेस्ट दरम्यान आरोपीला भ्रमित करण्यासाठी काही अनावश्यक प्रश्न देखील विचारण्यात आले. सीबीआय पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान संदीप घोष याला 25 प्रश्न विचारण्यात आले. बातमीनूसार पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान आरोपींना काही वेगळे प्रश्न देखील विचारण्यात आले. उदा. आकाशाचा रंग कोणता आहे. आज कोणती तारीख आहे ? असे प्रश्न मुद्दामहून विचारले गेले.