नाशिक विभागीय मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल 93.4 टक्के
नाशिक विभागीय मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल 93.4 टक्के
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक :  नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल हा 93.4 टक्के  लागला असून यावर्षी 1.88 टक्क्याने निकाल हा घसरला आहे. 

मार्च 25 मध्ये नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल हा नाशिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष बोरसे आणि विभागीय सचिव एम एस देसले यांनी मंगळवारी घोषित केला नाशिक विभागीय मंडळांमधून एक लाख 97 हजार चौदा विद्यार्थी हे प्रविष्ट झालेले होते त्यापैकी एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे पाच विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत नाशिक विभागाचा निकाल हा 93.4 टक्के लागला आहे.

नाशिक विभागीय मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक जिल्ह्या त 91 हजार 895 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले होते त्यापैकी 87 हजार 653 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत नाशिक जिल्ह्याचा निकाल हा 95.38 टक्के लागला आहे तर धुळे जिल्ह्यात मध्ये 28 हजार 36 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले होते त्यापैकी 24,420 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत धुळे जिल्ह्याचा निकाल हा 87.10 टक्के लागलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 56 हजार 236 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले होते त्यापैकी 52 हजार 846 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत .

जळगाव जिल्ह्याचा निकाल 93.97 टक्के लागला आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20847 विद्यार्थी हे प्रविष्ट झाले होते त्यापैकी 18 हजार 386 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले नंदुरबार जिल्ह्याचा निकाल 88.19 टक्के लागला आहे .  नाशिक जी विभागीय परीक्षा मंडळाचा निकाल हा मागील वर्षी 24 मध्ये 95.28 टक्के होता तर यावर्षी सन 2025 मध्ये हा निकाल 93.4 टक्के लागला आहे त्या तुलनेमध्ये 1.88 टक्के निकाल हा कमी लागल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group