एअर इंडियाचे विमान पुन्हा बिघडले ; अमेरिकेहून मुंबईला येताना कोलकत्यात इमर्जन्सी लँडिंग ; नेमकं काय घडले? वाचा
एअर इंडियाचे विमान पुन्हा बिघडले ; अमेरिकेहून मुंबईला येताना कोलकत्यात इमर्जन्सी लँडिंग ; नेमकं काय घडले? वाचा
img
Dipali Ghadwaje
अहमदाबाद विमान अपघातानंतर हवाई सेवांबाबत बरीच खबरदारी घेतली जात आहे. दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान  तांत्रिक समस्येमुळे हाँगकाँगला परतावे लागल्यानंतर, दुसऱ्या एका विमानातही काही तांत्रिक समस्या निर्माण झाली, ज्यामुळे विमान रिकामे करावं लागलं. हे विमान अमेरिकेहून मुंबईला येत होते. परंतु, कोलकातामध्येच विमानात समस्या निर्माण झाली ज्यामुळे ते रिकामे करण्यात आलं.

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईमार्गे कोलकाताला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला.

त्यानंतर पहाटे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. फ्लाइट एआय १८० मध्यरात्रीनंतर सुमारे ००.४५ वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचलं. परंतु, डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईला जाणारे विमान उशिरा आले. त्यानंतर, सुमारे ०५.२० वाजता, फ्लाइटमधील सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर पडण्यास सांगण्यात आलं.

सोमवारी, एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे विमानाला परतावे लागले. एअर इंडियाच्या ड्रीमलायनर बोईंग विमानाने दिल्लीसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यात तांत्रिक बिघाड झाला ज्यामुळे ते हाँगकाँगला परतावे लागले.

या प्रकरणी एअरलाइनने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये म्हटलं आहे की, फ्लाइट क्रमांक एआय ३१५ ने हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे लँडिंग केलं, सर्व प्रवासी सुरक्षितपणे उतरले. नंतर फ्लाइटची तपासणी करण्यात आली.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group