श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी
लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी

वडील आणि लेकीचं नातं हे शब्दापलीकडचं. लेकीच्या आनंदासाठी जगाशी लढणारा तो बाप असतो. छत्तीसगडच्या कवर्धा येथे घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेनं प्रत्येकाचेच डोळे पाणावतील. वडिलांनी त्यांच्या १० वर्षीच्या लेकीचा वाढदिवस समशानभूमीत साजरा केला. या घटनेनं तिथं असलेल्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले.
वडील आणि लेकीचं नातं हे शब्दापलीकडचं. लेकीच्या आनंदासाठी जगाशी लढणारा तो बाप असतो. छत्तीसगडच्या कवर्धा येथे घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेनं प्रत्येकाचेच डोळे पाणावतील. वडिलांनी त्यांच्या १० वर्षीच्या लेकीचा वाढदिवस समशानभूमीत साजरा केला. या घटनेनं तिथं असलेल्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले. वडिलांनी असं का केलं याच कारण समजून घेतल्यानंतर प्रत्येकाचं ह्रदय भरून येईल.
५ ऑक्टोबर रोजी कवर्धा येथे अदिती भट्टाचार्य (वय वर्ष १०) आणि तिच्या आईचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघींचाही मृत्यू झाला. अदितीच्या वडिलांनी ठरवलं होतं की, प्रथम अदितीचा वाढदिवस साजरा केला जाईल. त्यानंतर अदिती आणि तिची आई दोघांचे अंत्यसंस्कार केले जाईल.
इंद्रजित भट्टाचार्य हे मूळचे कोलकात्याचे रहिवासी. अदितीचे वडील आणि त्यांचे कुटुंब कोलकाताहून कवर्धा येथे आले होते. अपघातानंतर मृतदेहांमधून दुर्गंधी येऊ लागली होती. दोन्ही मृतदेहाला कोलकात्यामध्ये नेणं अशक्य होतं. त्यामुळे भट्टाचार्य कुटुंबाने कवर्धा येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी कवर्धा येथील लोहारा रोडवरील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी वडिलांनी लेकीचा स्मशानभूमीतच वाढदिवस साजरा केला.
वडिलांनी आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कार करण्यापूर्वी स्मशानभूमीत केक कापला. त्यांनी मृतदेहाजवळ फुगेही ठेवले होते. केक कापल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या मृतदेहाजवळ केकचा तुकडा नेला. यावेळी मुलीच्या वडिलांना रडू कोसळलं. उपस्थित कुटुंबियांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अदिती आपल्या आईसोबत सहलीसाठी आली होती. अदितीचे वडील कोलकात्यात होते. अदिती आणि तिच्या आईचा अपघात कलघरिया गावाजवळ घडला. भरधाव ट्रकने कोलकाताहून पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला धडक दिली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अदिती आणि तिच्या आईचाही मृत्यू झाला.