'या' व्हाट्सअॅप ग्रुपवर मिळायच्या सुंदर मुली, नंतर सुरु झालं घाणेरडं काम, मोठं रॅकेट उघड
'या' व्हाट्सअॅप ग्रुपवर मिळायच्या सुंदर मुली, नंतर सुरु झालं घाणेरडं काम, मोठं रॅकेट उघड
img
दैनिक भ्रमर
कानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला सुंदर मुली हव्या असतील तर फक्त या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन करा असा मॅसेज कानपूरमध्ये व्हाट्सअँपवरती चांगलाच व्हायरल होत होता. यामागचं सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वानाच धक्का बसला. 

मोठं रॅकेट उघड 
कानपूरमध्ये देहव्यापार करणारी टोळी सक्रिय झाली होती. ही टोळी व्हाट्सअॅपद्वारे ग्राहकांशी संपर्क साधायची.  मुलींचे फोटो आणि रेट पाठवायचे मग ग्राहकाने पसंत केल्यानंतर मुलींना हॉटेल, घर किंवा इतर ठिकाणी पाठवलं जायचं. विशेष म्हणजे जर ग्राहकाकडे भेटण्यासाठी जागा नसेल, तर टोळी स्वतःच ‘क्यूबिकल’ नावाच्या छोट्या-छोट्या खोल्या दोन तासांसाठी 500 रुपयांना भाड्याने द्यायची. 

रशियन आणि कॉलेजच्या मुलींचा सहभाग 
फक्त स्थानिक मुलीच नाही तर मागणीनुसार रशियन महिलाही ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जायच्या. याशिवाय, अनेक कॉलेजमधील मुलीही या धंद्यात सामील होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन संचालक, दोन महिला आणि सात ग्राहकांना अटक केली आहे. यामध्ये एक तरुणी आणि दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. छापेमारीदरम्यान पोलिसांनी अनेक आक्षेपार्ह सामग्री जप्त केली आहे.

तळघरात चालत होता गैरप्रकार
ज्या घरात हे रॅकेट चालत होतं, तिथे तळघर खास देह व्यापारासाठी तयार करण्यात आलं होतं. क्यूबिकल्स अशा प्रकारे बनवण्यात आली होती की, तिथे दोन तासांसाठी कोणताही ग्राहक थांबू शकेल आणि नंतर दुसरा ग्राहक आत जाईल. 

पोलिसांनी या टोळीविरुद्ध अनैतिक देह व्यापार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या रॅकेटशी आणखी कोण-कोण जोडलेले आहे आणि हा धंदा किती काळापासून चालत होता याचाही तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group