बंगळूरच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट;  अनेकजण जखमी
बंगळूरच्या प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट; अनेकजण जखमी
img
Dipali Ghadwaje
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे एक मोठा संशयास्पद स्फोट झाला, त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे.

बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात चारजण जखमी झाले आहेत. एचएएल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडलीय. एका वृत्त संस्थेच्या माहितीनुसार जखमींमध्ये ३ कॅफे कर्मचारी आणि एका ग्राहकाचा समावेश आहे. प्राथमिक अहवालानुसार, कॅफेमध्ये बॅग होती त्यात असलेल्या एका वस्तूचा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे.  
 
बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात किमान चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शहरातील राजाजीनगर येथील कॅफेच्या व्हाईटफिल्ड शाखेत दुपारी एकच्या सुमारास हा स्फोट झाला.

स्फोटाचे कारण अजुनही समजलेले नाही, पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group