पबमध्ये भीषण आग; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यानं चौथ्या मजल्यावरून उडी मारली
पबमध्ये भीषण आग; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यानं चौथ्या मजल्यावरून उडी मारली
img
Dipali Ghadwaje
बंगळुरू येथील कोरमंगला येथे असलेल्या एका पबला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. एका बहुमजली इमारतीच्या ४ थ्या मजल्यावर आग लागली असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोलमंगलामधील बहुमजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मडपाइप नावाचा पब होता. त्या पबमध्ये आग लागल्याची घटना घडली. हा पब बंगळुरूमधील प्रसिद्ध पब आहे. तवरेकेरे मेन रोडवर हा पब असून याच्या समोर फोरम मॉल आहे. प्राथमिक वृत्तानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार काहीजण गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचं सांगत आहेत. तर काहीजण शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवत आहेत. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. 

आग शमवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रवाना झाले आहेत. दरम्यान पबला आग लागल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये इमारतीच्या छतावर स्फोट होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग शमवण्याचे प्रयत्न करत आहेत. इमारतीच्या तळमजल्यावरूही आग लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

दरम्यान इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग भडकली आहे. आगीपासून जीव वाचवण्यासाठी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून एका उडी मारल्याचे देखील एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु त्याची प्रकृती कशी आहे याची पुरेशी माहिती अद्याप मिळालेली नाहीये. दरम्यान अग्निशमन दल आग शमवण्याचे शर्तीतेच प्रयत्न करत आहेत. तर बचाव कार्यदेखील करत आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group