सातपूर-अंबड लिंक रोडवर इलेक्ट्रिक बाईकच्या कारखान्याला भीषण आग; लाखों रुपयांचे नुकसान
सातपूर-अंबड लिंक रोडवर इलेक्ट्रिक बाईकच्या कारखान्याला भीषण आग; लाखों रुपयांचे नुकसान
img
दैनिक भ्रमर


सातपूर : सातपूर-अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्म मागे असलेल्या इलेक्ट्रिक बाईक कंपनी व गोडावूनला आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बजरंग नगर येथे मनसा इलेक्ट्रिक गाडी जोडणीचा कारखाना व गोडाऊन आहे. आगीत इलेक्ट्रिक बाईक चेसी, बॉडी, स्पेअरपार्ट, टूल,   लॅपटॉप, इलेक्ट्रिक गाड्यांसह कॉम्प्युटर व इतर साहित्य असे लाखों रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते.  कंपनी मालक बाहेरगावी असल्याने आगीत किती गाड्या जळून खाक झाल्या याचा आकडा मिळू शकला नाही.

दरम्यान, अग्निशमन विभागाच्या सात गाड्यांनी १२ ते १४ फेऱ्या मारून दोन तासांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये

Nashik :

Join Whatsapp Group