मुंबईतील एका कॉन्सर्टमधील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांची जोडी नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय ठरली होती. आता डेटिंगच्या अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी ब्रेकअप केल्याचं म्हटलं जात आहे. याला गायक एपी ढिल्लोचा कॉन्सर्टच कारणीभूत असल्याची चर्चा रंगत आहे.
‘फिल्मफेअर’नं दिलेल्या वृत्तानुसार, तारा आणि वीरने सहमताने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही. परंतु एपी ढिल्लोच्या कॉन्सर्टमधील व्हिडीओनंतर दोघांचा ब्रेकअप झाल्याने, नेटकऱ्यांनी त्याच्याशी संबंध जोडला आहे. या ब्रेकअपच्या चर्चांवर अद्याप तारा किंवा वीरने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. वीर पहारिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमुळे वाद?
काही आठवड्यांपूर्वी तारा आणि वीर मुंबईत झालेल्या एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसले होते. याच कॉन्सर्टदरम्यान एपी ढिल्लोंने ताराला गालावर किस केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे, त्या वेळी वीरही तिथे उपस्थित होता आणि त्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या लक्षात राहिली होती. यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ताऱ्याने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत, “खोट्या अफवा, चुकीचं एडिटिंग आणि पैशासाठी केलेली पीआर आम्हाला हादरवू शकत नाही. शेवटी प्रेम आणि सत्याचाच विजय होतो,” असं म्हटलं होतं. तर वीरनेही आपली प्रतिक्रिया देत, व्हायरल झालेला रिअॅक्शन एपी ढिल्लोंच्या ‘थोडी सी दारू’ या गाण्यावर नसून दुसऱ्या गाण्यावर होता, असं स्पष्ट केलं होतं.
आता फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप झाला आहे. मात्र अद्याप तारा-वीरने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यांनी ही बाब खासगीत ठेवली आहे. तारा आणि वीरने 2025 च्या सुरुवातीपासून एकमेकांना डेट करत होते.