लग्नाचा आनंदोत्सव दु:खात बदलला ; कार अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू
लग्नाचा आनंदोत्सव दु:खात बदलला ; कार अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
लग्न समारंभ आटोपून परतत असताना भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना झारखंडमधील गिरिडीहमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.  या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सगीर अंसारी, युसूफ मियां, इम्तियाज अंसारी, सुभान अंसारी, अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेत मृत व्यक्ती हे गिरिडीह जिल्ह्यातील थोरिया येथील रहिवासी आहेत. ते गुरुवारी तिकोडीह येथे नातेवाईकाच्या विवाह समारंभारासाठी गेले होते. विवाह समारंभाचा कार्यक्रम आटोपून कारने परतत असताना बागमारा पोलिस स्टेशनच्या हद्दीत चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.
 
काही कळण्याच्या आत कार अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर आदळली. या भयानक घटनेत कारमधील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group