मोठी बातमी :  हेमंत सोरेन यांचा राजीनामा, ईडीकडून अटक होण्याची शक्यता
मोठी बातमी : हेमंत सोरेन यांचा राजीनामा, ईडीकडून अटक होण्याची शक्यता
img
दैनिक भ्रमर

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असून चंपाई सोरेन हे नवीन मुख्यमंत्री असतील. आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

जमिनी घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली असून हेमंत सोरेन यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. चंपई सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार असून थोड्याच वेळात राज्यपाल त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. तर कोणत्याही क्षणी हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. 

हेमंत सोरेन यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र कुटुंबातून विरोधाचा आवाज उठवला जात होता.

दरम्यान, JMM, काँग्रेस आणि RJD विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंपाई सोरेन यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

चंपाई सोरेन हे सरायकेला मतदारसंघाचे आमदार आहेत असून सध्या परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विश्वासू मानले जातात. 

हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना मुख्यमंत्री होऊ शकतात अशी अटकळ बांधली जात होती. मात्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर चंपाई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची कमान सोपवण्यात आली. 

हेमंत सोरेन यांना अटक होणार

जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असणाऱ्या हेमंत सोरेन यांना कधीही अटक होऊ शकते.


इतर बातम्या
Join Whatsapp Group