झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या २२ वर्षीय नातवाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 'मृत तरुणाचे नाव वीर सोरेन असे आहे.एका बंद खोलीत सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला. खोलीतून तातडीने रुग्णालयात नेताना त्याच्या तोंडातून फेस येता होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. वीर सोरेनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अस्पष्ट आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
पोलिसांना सोमवारी रुग्णालयातून माहिती मिळाली की, शासकीय रुग्णालयात एका पर्यटकाला मृत अवस्थेत आणलं आहे. रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांना प्राथमिक तपासात कळालं की, 'मृत तरुणाचे नाव हे वीर सोरेन त्याचे नाव आहे. तो चंपई सोरेन यांचा नातू आहे. तो मित्र अग्नय वर्मासोबत मनालीला फिरायला आला होता.
अग्नयने पोलीस चौकशीत सांगितलं की, वीरसोबत २२ फेब्रुवारी रोजी मनालीला फिरायला आलो होतो.दोघे स्थानिक नागरिकांच्या 'होमस्टे'मध्ये थांबलो. दोघे २३ फेब्रुवारी रोजी सोलंग आणि सेथन येथे फिरायला गेलो. सायंकाळी पुन्हा 'होमस्टे'मध्ये आलो. सोमवारी होम स्टेजवळील भागात फिरून साडेबारा वाजता परतलो. वीर सोरेन 'होमस्टे'मध्ये आल्यावर झोपी गेला.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोके दुखायला लागले. त्यामुळे त्याचासाठी ऑनलाइन औषध मागवलं. प्रकृती बिघडलेल्या वीरने औषध प्यायलं. त्यानंतर दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीतून मोठा आवाज आला. खोलीत गेल्यानंतर बघितलं तर वीर सोरेन बेडवरून खाली पडला होता. मी तातडीने गाडी बोलावली. त्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
वीरचे कुटुंबीय मनालीला आल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदनानंतर वीरच्या मृत्यूचे कारण समोर येईल.