ईडीची मोठी कारवाई! मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड ; नोटा मोजून ईडी अधिकारी थकले
ईडीची मोठी कारवाई! मंत्र्याच्या PA कडे सापडलं कोट्यवधींचं घबाड ; नोटा मोजून ईडी अधिकारी थकले
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीच्या ऐन हंगामात झारखंडमध्ये ईडीने छापेमारी केली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये सोमवारी पहाटे अनेक  ईडीने भल्यापहाटे छापा टाकला.  दरम्यान रांची येथे मनी लाँड्रिंग प्रकरणात ६ ठिकाणांवर कारवाई केल्याची माहिती येत आहे.

ईडीने मंत्र्याच्या खासगी सचिवाकडे काम करणाऱ्या एका नोकराच्या घरावर भल्यापहाटे छापा टाकला.  यावेळी कोट्यवधींचं घबाड आढळून आलं. पैशांचा ढीग पाहून ईडी अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. नोटा मोजण्यासाठी मशीनी मागवण्यात आल्या आहेत.

 या नोटा नेमक्या कुठून आल्या? याची चौकशी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीने सोमवारी पहाटेच्या सुमारास झारखंडमधील रांची शहरात अचानक छापेमारी केली. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या पीएच्या घरी काम करणाऱ्या एका नोकराच्या घरावर ईडीने धाड टाकली.


यावेळी जवळपास २५ कोटी रुपयांचं घबाड ईडी अधिकाऱ्यांना सापडलं. नोटांचा ढीग पाहून ईडी अधिकारीही चक्रावले. पैसे मोजण्यासाठी बँकेतून कर्मचारी आणि मशीन मागवण्यात आल्या आहेत. सध्या ईडीचे अधिकारी नोकराची कसून चौकशी केली आहे.

दरम्यान, हे पैसे मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचे असल्याचं नोकराने सांगितलं आहे. निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group