भीषण अपघात! भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, इतके प्रवासी जखमी
भीषण अपघात! भरधाव डंपरची बसला धडक; २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, इतके प्रवासी जखमी
img
Dipali Ghadwaje
आज सकाळी रायगडमध्ये पुण्याहून कोकणकडे सहलीला निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला. ५७ प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५५ जण जखमी जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा पालघरमधून एक भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या मनोर- विक्रमगड रोडवर बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघरच्या मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी (३० डिसेंबर) बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला. मनोर विक्रमगड रोडवर बोरांडा येथे भरधाव डंपरने बसला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसमधील दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर १५- २० प्रवासी गंभीर जखमी झाले.

दरम्यान जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हालवले. अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एसटी बसचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group