ऑनलाईन खाद्यपदार्थ घरोघरी पुरवणाऱ्या फुड कंपनी झोमॅटोच्या मुंबईतील सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय आजपासून संपावर जाणार आहेत. शिंदे गट, प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात सर्व डिलिव्हरी बॉय हा लढा लढणार आहेत.
दरम्यान, त्यांच्या विविध मागण्यांन संदर्भात मुंबई मधील झोमॅटो डिलिव्हरी बॉय यांनी पुकारलेल्या संपामुळे घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या मुंबई करांचे प्रचंड प्रमाणावर हाल होणार आहे.
काय आहेत झोमॅटो डिलिव्हरी बॉईजच्या मागण्या?
- सर्व डिलिव्हरी बॉईजला समान ऑर्डर मिळाव्यात आणि पैसे वाढवून मिळावेत
- पीक अप 3 किमी आणि ड्रॉप 7 किमी असावा
- जुन्या मात्र कमी केलेल्या मुलांना पुन्हा कामावर घ्यावं
- रायडरसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही इन्शुरन्स मिळावा
- इंसेंटिव्ह सर्वांना समान मिळावा
आणि इतर मागण्या दरम्यान या संपामुळे ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.