नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" कारणामुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा
img
दैनिक भ्रमर

ट्रक-टँकर चालकांच्या संपामुळे नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर रांगाच रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी रांग रस्त्यावर गेल्याने वाहतूक विस्कळीत होत होती. तर अनेक पंपांवर डिझेल संपल्याने नागरिकांना डिझेल शोधत फिरावे लागत होते. 

केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक-टँकर चालकांनी संप उद्या दि. 2 पासून 3 दिवस संप पुकारला आहे. टँकर चालकही या संपात सहभागी असल्याने राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे.

नाशकात गॅस गळतीमुळे भीषण स्फोट,  दोन जण गंभीर जखमी
https://dainikbhramar.com/news/v/1386/massive-explosion-due-to-gas-leak-in-destroyer-two-seriously-injured

हा संप लांबल्यास एसटी महामंडळाच्या वाहतुकीवरही इंधन अभावी परिणाम होण्याची भीती आहे. मनमाडमधून इंधन पुरवठा नसल्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला फटका बसणार आहे.
इतर बातम्या
सुहास कांदे यांचा

नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group