लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असतानाच ठाकरे गटाची गळती सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला असून ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आणखी एका आमदाराने साथ सोडल्याने ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार पाडवी हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.