अर्थसंकल्पाआधी सर्वसामन्यांना दिलासा! गॅस सिलेंडर झाला स्वस्त , जाणून घ्या काय आहे  किंमत
अर्थसंकल्पाआधी सर्वसामन्यांना दिलासा! गॅस सिलेंडर झाला स्वस्त , जाणून घ्या काय आहे किंमत
img
Dipali Ghadwaje

फेब्रुवारीच्या पहिल्या सकाळी लोकांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सरकारी तेल बाजार कंपन्यांनी सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. अर्थमंत्रि निर्मला सितारमन आज २०२५-२६ वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे देशाचं याकडे लक्ष लागलेय. पण त्याआधीच ही दिलासा देणारी बातमी मिळाली आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात झाली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक सिलिंडरच्या दरात ७ रूपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून किंमती लागू करण्यात आल्या आहेत.

२०२५ वर्षाच्या दुसर्‍या महिन्यातही सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. आता दिल्लीमध्ये व्यवसायिक गॅसची किंमत १७९७ रूपये इतक्या रुपयांना मिळणार आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

मागील आठ महिन्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली.

घरगुती १४.२ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च २०२५ मध्ये घरगुती गॅसच्या किंमतीत बदल झाला होता, त्यावेळी गॅसच्या किंमती १०० रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group