लग्नासाठी गॅस सिलिंडर हवाय? टंचाईच्या काळातही ५ ते ८ सिलिंडर मिळवणं शक्य; जाणून घ्या काय आहे नवी बुकिंग प्रक्रिया!
लग्नासाठी गॅस सिलिंडर हवाय? टंचाईच्या काळातही ५ ते ८ सिलिंडर मिळवणं शक्य; जाणून घ्या काय आहे नवी बुकिंग प्रक्रिया!
img
नितीशा कुलकर्णी





इराण-इस्त्राइलच्या यूद्धाचा फटका अनेक गोष्टींना बसत आहे. त्यामुळे एलपीजी सिलेंडरचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. लग्नसराई सुरु झाल्याने एलपीजी सिलेंडरची टनचाइ अधिक भासू लागली आहे. या काळात तुम्हाला गॅस सिलिंडर्सची आवश्यकता भासल्यास, त्यांची नोंदणी कशी करावी जाणून घ्या.

मध्य पुर्वेतील तणावामुळे देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा काही प्रमाणात जाणवत आहेत, पुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने मोठी पावले उचलली आहेत. बुकिंगच्या नियमातही बदल केले आहेत.मात्र आता देशात लग्नसराई सुरु झाली आहे. या काळात तुम्हाला गॅस सिलिंडर्सची आवश्यकता भासल्यास, त्यांची नोंदणी (बुकिंग) करण्यासाठी तुम्हाला थोडी वेगळी प्रक्रिया करावी लागेल.

जर तुमच्या घरी एखादे लग्नकार्य किंवा समारंभ आयोजित केला असेल आणि त्या प्रसंगासाठी तुम्हाला गॅस सिलिंडर्सची गरज असेल, तर एलपीजी सिलिंडरची नोंदणी कशी करावी आणि लग्नाच्या समारंभासाठी तुम्हाला जास्तीत जास्त किती सिलिंडर्स मिळण्याचा अधिकार आहे? तसेच नेमकी प्रोसेस काय आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याबाबत जाणून घेऊया.

लग्नासाठी गॅस सिलिंडर्सची आवश्यकता असते आणि ही गरज गॅस एजन्सींद्वारे पूर्ण केली जाते. या लग्नसमारंभासाठी तुम्हाला ५ ते ७ गॅस सिलिंडर्स मिळू शकतातपण अनेक ठिकाणी ८ सिलिंडर्स देखील उपलब्ध करुन दिले जात आहेत.

गॅस सिलिंडर कसे मिळवाल?
जर तुम्हाला लग्नासमारंभासाठी गॅस सिलिंडर्सची आवश्यकता असेल, तर तुम्ही ते थेट एजन्सीकडून मिळवू शकता. यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीला भेट द्यावी लागेल. तेथे पोहोचल्यावर, संबंधित अधिकाऱ्याची भेट घ्या आणि तुम्हाला लग्नासमारंभासाठी सिलिंडर्सची गरज आहे असे सांगा.बीपीसीएल ग्राहकांना

ॲपद्वारे मिळतील सिलिंडर
जर तुम्ही 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड'चे (BPCL) ग्राहक असाल, तर कंपनीने एक विशेष व्यवस्था केली आहे. याअंतर्गत तुम्ही 'Hello BPCL' ॲपद्वारे थेट लग्नासाठी सिलिंडर्सची नोंदणी करू शकता. ॲपमध्ये प्रवेश केल्यानंतर, तुम्हाला काही विशिष्ट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. ती पूर्ण केली की तुमचे बुकिंग पक्के होईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group