ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम "या" मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात
img
दैनिक भ्रमर

मुंबई : भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत होणार आहे. 

अनेक दिवसांपासून वेटिंगवर असलेल्या पूनम महाजन यांच्या जागी भाजप दुसरा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात होती. या जागेवर भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे.


पूनम महाजन यांना मतदार संघात होत असलेला विरोध यामुळे भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे.  उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group