त्र्यंबक रोडवर
त्र्यंबक रोडवर "या" हॉटेल मध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
img
दैनिक भ्रमर


नाशिक : त्र्यंबक रोडवर एका हॉटेल मध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून एका महिलेची सुटका करून दलालास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबक रोडवरील खंबाळे शिवारात मानस लॉजिंग बोर्डिंग नावाचे हॉटेल आहे. येथे कुंटणखाना चालत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. यावरून बनावट गिऱ्हाईक पाठवून एका पीडित महिलेची सुटका केली.

कुंटणखाना चालविणारा दलाल किशोर निवृत्ती शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हॉटेलचा मालक गणेश भिला मोरे हा फरार आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्र्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group