सतत कोसळणाऱ्या पावसाने लातूरमध्ये हाहाकार माजवला असताना लातूरमध्ये आणखी एक संकट आले आहे. पावसाने आधीच मेटाकुटील आलेले लातूरकर आता भूकंपामुळे अडचणीत आले आहे. मंगळवारी रात्री लातूरमधील मुरूडला भूकंपाचे सौम्य धक्के जाणावले. अचानक जमीन हादरू लागल्यामुळे लोकांची पळापळ झाली.
लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला परिसरात रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान भूकंपाचा केंद्रबिंदू हा लातूर शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या मुरुड आकोला परिसरात आहे. भूकंपाची खोली ही ५ किलोमीटर पर्यंत आहे.
भूकंपाची सौम्य नोंद असली तरी नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आव्हान प्रशासनाच्या वतीने केलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कच्च्या घरात न राहता सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सांगण्यात आलं आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः नदीकाठची शेती पिके संपूर्ण पाण्यात वाहून गेली आहेत. लातूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज करणार आहेत.