पावसामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता भूकंपाचे धक्के सहन करावे करावे लागत आहे. सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्क्याने लातूर हादरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. कालच लातूरच्या मुरुड अकोला गावात २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. तर आज लातूरच्या बडूर, उस्तुरी गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. २.४ रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या निलंगा तालुक्यातील बडूर आणि उस्तुरी गावात रात्री ९ वाजून ३० मिनिटाला भूंपाचे धक्के जाणवले. २.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. कलबुर्गी, लापूर, नांदेड आणि लातूर या ठिकाणच्या भूकंप मापक यंत्रावर तपासणी करण्यात आली. त्यानंतर २.४ रिश्टर स्केल या सौम्य भूकंपाची नोंद आढळून आली.
९९३ साली झालेल्या किल्लारी भूकंपाची पुनरावर्ती होती की काय? अशी भीती नागरिकांमध्ये आहे. मात्र दोन्ही भूकंपाचे धक्के हे सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.