मोठी बातमी :  त्रिपुरा राज्यात भूकंपाचे धक्के; 4.4 रिश्टर स्केलची नोंद
मोठी बातमी : त्रिपुरा राज्यात भूकंपाचे धक्के; 4.4 रिश्टर स्केलची नोंद
img
Dipali Ghadwaje
त्रिपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. त्रिपुरा पुन्हा एकदा भूकंपाने हादरलं आहे. शनिवारी दुपारी ३.४८ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला आहे. त्रिपुरात ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. 'एनआयए'ने याबाबत वृत्त दिलं आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरात ४.४ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्रिपुरातील धर्मनगरच्या ७२ किमी उत्तर पूर्व येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या आधी देखील त्रिपुरात भूकंप झाला होता. त्यावेळी त्रिपुरात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरात भूकंपाचे धक्के शनिवारी दुपारी ३.४८ वाजण्याच्या सुमारास जाणवले. आतपार्यंत या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group