दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी ९.०४ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले. सुरुवातीच्या माहितीनुसार,4.4 तीव्रतेचा भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये हा तिसरा भूकंप धक्का आहे. यापूर्वी १७ फेब्रुवारी आणि १९ एप्रिल रोजीही भूकंपाचे धक्के बसले होते.
हरियाणातील रोहतक , जिंद आणि बहादूरगड व्यतिरिक्त, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील भागातही 10 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर होते. येथे रिश्टर स्केलवर तीव्रता 4.4 होती. त्यामुळे दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) परिसराला भूकंपाचा जोरदार धक्का बसला. याचे हादरे उत्तर भारतातील अनेक भागांतही जाणवले.या भूकंपामुळे इमारती हादरल्याने, घाबरलेले रहिवासी घराबाहेर मोकळ्या जागेकडे धावले. तथापि, या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या झज्जर येथे सकाळी ९.०४ वाजता 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भाग राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे आणि दिल्लीपासून जवळजवळ ६० किलोमीटर अंतरावर आहे. एनसीआरमधील दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद येथे भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील सोनीपत, रोहतक आणि हिसार येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.