गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
img
DB
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात पाकिस्तानला पाठिंबा देणारे जगातील देश आता निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जात आहेत. तुर्की आणि चीन या दोन्ही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (एनएससी) सांगितले की, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी होती. सुरुवातीच्या माहितीनुसार आज सकाळी साडे सहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के  जाणवले. भूकंपाचे केंद्र जमिनीत 10 किलोमीटर खोलवर होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी  नुसार, गुरुवारी संध्याकाळी तुर्कीयेमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजली गेली. तुर्कीच्या मध्यवर्ती भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानी अंकारामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

गेल्या एका आठवड्यात जगातील अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तान, चीन आणि तुर्की व्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी रात्री 1 वाजता अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 मोजण्यात आली. सध्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group