मोठी बातमी! ''या'' जिल्ह्यात पहाटेच भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती
मोठी बातमी! ''या'' जिल्ह्यात पहाटेच भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती
img
Nandini khandare More


 हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.  हिंगोली जिल्ह्यातजाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  

समोर आलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात दुपारपासून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. सर्वाधिक धक्के वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव परिसरात जाणवले.
 
काही दिवसांपूर्वीच 4.7 रीक्टर स्केलच्या भूकंपामुळे वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात घराला गेले तडे गेले होते.  हिंगोली जिल्ह्यात आज जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवितहाणी झाल्याचे वृत्त नाही. मात्र वारंवार जाणवणाऱ्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group