पाकिस्तान आणि चीनमध्ये आजपहाटेच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने घरातील भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे गाढ झोपेत असलेले लोक दचकून उठले. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेकजण घराबाहेर पडले होते. यामध्ये कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
दुसरीकडे पापुआ न्यू गिनीमध्येही आजपहाटे सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप झाला. न्यू गिनीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर झालेल्या या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक घरांना तडे गेल्याची माहिती आहे.
पाकिस्तानमध्ये आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी होती. घरांना हादरले बसल्याने भाड्यांची पडझड झाली. त्यामुळे गाढ झोपेत असलेले लोक घराबाहेर पडले. लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे.
दुसरीकडे चीनला देखील भूकंपाचा हादरा जाणवला आहे. चीनच्या जिजांगमध्ये ५.०.रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.