देशातील 'या' राज्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
देशातील 'या' राज्यात पुन्हा भूकंपाचे धक्के
img
दैनिक भ्रमर
हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गुरुवारी (दि. ४) रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रात्री ९.३४ वाजता हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 एवढी होती, जी जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होती. त्याचा केंद्रबिंदू चंबा असल्याचे सांगितले जाते. सध्या भूकंपाबद्दल अधिक माहिती गोळा केली जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.  भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले, असे सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group