बीसीसीआयने मेगा ऑक्शनची तयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे ऑक्शन होऊ शकते. यासह लवकरच किती खेळाडू रिटेन करता येणार याबाबत माहिती दिली जणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

दरम्यान हे ऑक्शन केव्हा होणार अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तर माध्यमातील वृत्तानुसार, आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणारं ऑक्शन हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. या ऑक्शनची घोषणा होण्यापूर्वी, किती खेळाडूंना रिटेन करता येणार याबाबतची माहिती समोर येईल.
मेगा ऑक्शन केव्हा अन् कुठे होणार?
मेगा ऑक्शनची तारीख आणि ठिकाण अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. आगामी मेगा ऑक्शन यावेळी भारतात न होता, परदेशात आयोजित केले जाऊ शकते. गेल्या वर्षी आयपीएलचा लिलाव दुबईत पार पडला होता. यावेळीही हा सोहळा परदेशात आयोजित केला जाऊ शकतो.
आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. सर्व संघात स्टार खेळाडूंची भरमार आहे. त्यामुळे कोणाला संघात ठेवायचं आणि कोणाला बाहेर करायचं हा प्रश्न संघमालक आणि टीम मॅनेजमेंटला सतावणार यात काहीच शंका नाही.