धक्कादायक ! वानखेडे  स्टेडियममधील बीसीसीआयच्या स्टोअरमधून 'या' संघाच्या खेळाडूंची जर्सी चोरी, नेमकं प्रकरण काय ?
धक्कादायक ! वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या स्टोअरमधून 'या' संघाच्या खेळाडूंची जर्सी चोरी, नेमकं प्रकरण काय ?
img
Vaishnavi Sangale
IPL म्हणजे भारतीयांचे जीव की प्राण बनली आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज आणि आणखी काही संघ यात खेळत असतात. सध्या IPL सुरु नाही. पण इथे या संघाच्या खेळाडूंच्या जर्सी आहेत. पण एवढ्या कडेकोड सुरक्षतेत देखील त्या चोरीला गेल्या आहेत. एक दोन नव्हे तर तब्ब्ल 261 आयपीएल जर्सी चोरीला गेल्या आहेत. 

मुंबईतील  वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या अधिकृत मर्चंडाईज स्टोअरमधून सुमारे 6.52 लाख रुपयांच्या 261 आयपीएल जर्सी चोरीला गेल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. ही चोरी 13 जून 2025 रोजी झाली होती, परंतु त्याची अधिकृत तक्रार 17 जुलै रोजी दाखल करण्यात आली होती. ही तक्रार बीसीसीआयचे कर्मचारी हेमांग भरत कुमार अमीन यांनी दाखल केली आहे. 

मोठी बातमी ! भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी रद्द, ग्रॅन्ड मुफ्तींची माहिती

अमीन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी फारुख असलम खान, जो मीरा रोड पूर्वेतील गौरव एक्सलन्सीचा रहिवासी आहे आणि सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करतो, त्याने परवानगीशिवाय स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टोअरमध्ये प्रवेश केला आणि चोरी केली. पोलिसांनी आरोपी फारुख असलम खानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे.

चोरी झालेल्या जर्सींमध्ये दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स , पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू , राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यासारख्या प्रमुख आयपीएल संघांच्या खेळाडूंच्या जर्सींचा समावेश आहे.
IPL | BCCI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group