अफवा की सत्य ?  भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी रद्द, ग्रॅन्ड मुफ्तींची माहिती,  वाचा सविस्तर
अफवा की सत्य ? भारतीय नर्स निमिषा प्रियाची फाशी रद्द, ग्रॅन्ड मुफ्तींची माहिती, वाचा सविस्तर
img
Vaishnavi Sangale
येमेनमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए. पी. अबुबकर मुसलियार यांच्या कार्यालयाने सोमवारी एक महत्त्वाची घोषणा केली. 2017 साली येमेनमध्ये झालेल्या खून प्रकरणात दोषी ठरलेली भारतातील केरळची परिचारिका निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा येमेनी अधिकाऱ्यांनी पूर्णतः रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. 

धक्कादायक! जुन्या वादातून राडा, रक्तरंजित हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दुसरा...

येमेन सरकारकडून अद्याप अधिकृत पुष्टी नाही
भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. भारताचे ग्रॅन्ड मुफ्ती कांथापुरम एपी अबूबकर मूसलियार यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. ग्रॅन्ड मुफ्तींच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा जी आधी स्थगित करण्यात आली होती, ती आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. मात्र, या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे की येमेन सरकारकडून अद्याप याची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

संतापजनक! 'या' पोलीस स्टेशनमध्येच 3 तरुणांचा अनैसर्गिक लैंगिक छळ; PSI निलंबित

भारत सरकारकडून अधिकृत पुष्टी नाही
भारत सरकारही बऱ्याच काळापासून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, शिक्षा रद्द करण्याच्या दाव्यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की आतापर्यंत निमिषाची फाशीची शिक्षा रद्द झालेली नाही. आता या प्रकरणावर पसरणाऱ्या अफवांवर सरकार कधी निवेदन जारी करते हे पाहणे बाकी आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group