निमिषाने तलालला जे इंजेक्शन देऊन मारले, त्या इंजेक्शनचे नाव आले समोर
निमिषाने तलालला जे इंजेक्शन देऊन मारले, त्या इंजेक्शनचे नाव आले समोर
img
दैनिक भ्रमर
संपूर्ण भारतात सध्या निमिषा प्रियाची चर्चा सुरु आहे. फाशी होण्यापासून तर ती टळेपर्यंत तिच्यासोबत काय सुरु आहे यावर भारतीय डोळे टिकून आहेत. सध्या तरी तिची फाशी टळलेली आहे ती रद्द झालेली नाही. आज हे प्रकरण आपण आणखी थोडं खोलात जाऊन पाहूया. म्हणजे निमिषा प्रियाने दिलेल्या ज्या इंजेक्शन मुळे  तलाल महदीचा जीव गेला ते नेमकं कोणतं इंजेक्शन आहे हा प्रश्न सर्वानाच पडला आहे. तर त्या इंजेक्शनमध्ये  केटामाइन नावाचे औषध होते.  हे एक भूल देणारे औषध आहे जे वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाते. मला तलालला मारायचे नव्हते, माझा हेतु त्याला फक्त त्याला बेशुद्ध करण्याचा होता असा दावा वारंवार निमिषाकडून केला जात आहे.

जुलै 2017 साली तलालच याचे निधन झाले. मीडिया रिपोर्टमुनुसार निमिषा आणि तिच्या कुटुंबावर आधारित एक बातमी होती, अनेक वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या अहवालात केटामाइनचे नाव पुढे आले होते. हे एक शक्तिशाली डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेटिक औषध आहे, जे वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाते, कधीकधी ते बेकायदेशीर ड्रग्जच्या गैरवापरासाठी देखील वापरले जाते.

निमिषाशी झालेल्या संभाषणाच्या आधारे प्रकाशित झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की जुलै 2017 मध्ये मध्ये तिने तलालला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिले होते. तिला त्याच्याकडे असलेला पासपोर्ट मिळवायचा होता, कारण तोच पासपोर्ट ताब्यात ठेऊन तलाल तिला ब्लॅकमेल करत होता. निमिषाच्या सांगण्यानुसार, येमेनमध्ये तिने उघडलेल्या क्लिनिकजवळ एक तुरुंग होता, त्याच तुरूंगाच्या वॉर्डनने तिला तलालला बेशुद्ध करण्याचा सल्ला दिला होता. 

निमिषाने यासाठी तयारी केली. तिला जेव्हा संधी मिळाली तेव्हा तिने त्याला भूल देण्याचे इंजेक्शन दिले, परंतु त्या इंजेक्शनचा तलालवर कोणताही परिणाम झाला नाही, कारण तो आधीच ड्रग्ज घेत होता. यानंतर निमिषाने त्याला केटामाइनचे इंजेक्शन दिले, जेव्हा तो घरी ड्रग्ज घेत होता तेव्हा तिने हे केले. काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला आणि जोरजोरात ओरडायला लागला. अचानक त्याच्या हृदयाची धडधड थांबली. ते पाहून निमिषाने नर्स असलेल्या तिच्या मैत्रिणीला हनानला फोन केला. तिला तलालबद्दल सगळंच माहीत होतं. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करण्यात आले आणि ते पाण्याच्या टाकीत फेकून दिले. या प्रकरणात हनानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि निमिषाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group