टीम इंडियाला मोठा धक्का! 2 दिग्गज खेळाडू संघातून बाहेर, नव्या खेळाडूला मिळाली संधी
टीम इंडियाला मोठा धक्का! 2 दिग्गज खेळाडू संघातून बाहेर, नव्या खेळाडूला मिळाली संधी
img
Dipali Ghadwaje
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सध्या पहिल्या दोन सामन्यांनंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आज भारताने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. 

बोर्डाने विराट कोहलीला तिन्ही सामन्यांसाठी ब्रेक दिला आहे. बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, विराट कोहलीने उर्वरित तीन सामन्यांमधून विश्रांती मागितली होती. बोर्डाने त्याची विनंती मान्य केली आहे. विराट कोहली हैदराबाद आणि विशाखापट्टणम कसोटी सामन्यातही खेळला नव्हता.
 
गेल्या तीन सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचीही नावे आहेत, परंतु या दोन खेळाडूंचा सहभाग मेडिकल टीमकडून फिटनेसला मान्यता मिळण्यावर अवलंबून असेल, असे बोर्डाने म्हटले आहे. जडेजा आणि राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकले नाहीत. कोहलीबाबत बोर्डाने म्हटले की, विराट वैयक्तिक कारणांमुळे तिन्ही सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध नाही. मंडळ त्याच्या निर्णयाचा आदर करते.
 
दरम्यान वेगवान गोलंदाज आकाश दीप हा भारतीय संघातील नवा चेहरा आहे. त्याचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. आवेश खानला बाहेर काढून आकाश दीप संघात आला आहे. यापूर्वी आकाश दीप इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळताना दिसला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या चमकदार कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. 

आता आकाशचा बॅकअप वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, श्रेयस अय्यरचे नाव संघात नाही. अय्यरबद्दल 2-3 दिवसांपूर्वी बातमी आली होती की, त्याच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे तो मालिकेतील तीनही सामने खेळू शकणार नाही. श्रेयस सध्या एनसीएमध्ये आहे.

शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group