चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज एमएस धोनीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वानखेडे मैदानावर सामना पाहायला आलेल्या एका छोट्या चाहतीला चेंडू भेट दिला होता. आता त्याच चिमुकलीने धोनीला एक खास वचन दिले आहे. तिने दिलेल्या वचनाची सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
14 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धोनीने शेवटच्या 4 चेंडूत 20 धावांची इनिंग खेळली होती. डावात फक्त 4 चेंडू बाकी असताना माही सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. माहीने शेवटच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याला पहिल्या तीन चेंडूत सलग सहा षटकार ठोकले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 2 धावा केल्या. डाव संपल्यानंतर माही पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने तिथे पडलेला चेंडू उचलला आणि एका लहान चाहत्या मुलीला दिला. आता त्याच चिमुकल्या चाहत्या मुलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. या चाहत्या मुलीचे नाव मेहर असून ती क्रिकेटही खेळते.
काय म्हणाली चिमुकली?
"स्टार स्पोर्ट्सवर बोलताना चिमुकली म्हणाली, माझे नाव मेहर आहे आणि मी तीच नशिबवान मुलगी आहे ज्या मुलीला धोनी काकांनी चेंडू दिला होता. ती पुढे म्हणाली, "मी क्रिकेट खेळते आणि हे माझे स्वप्न आहे की मी भारतासाठी खेळेन तेव्हा हा चेंडू कुणाला तरी भेट देईन."