आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये 'या' 2 नविन नियमांचा समावेश ; जाणून घ्या सविस्तर
आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये 'या' 2 नविन नियमांचा समावेश ; जाणून घ्या सविस्तर
img
दैनिक भ्रमर
आयपीएल 2024 सीझन 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दोन नवीन नियमांचा समावेश असेल. या नवीन नियमामुळे पंच आणि गोलंदाजांना मोठा दिलासा मिळणार आहे.

IPL 2024 मध्ये गोलंदाजांसाठी बाउंसर आणि पंचांसाठी स्मार्ट रिव्ह्यू सिस्टमचे नियम लागू केले जातील. म्हणजेच, यावेळी गोलंदाज आणि पंच दोघांचीही मोठी मदत मिळणार आहे.

'या' दमदार खेळाडूची 'दिल्ली कॅपिटल्स'च्या कर्णधारपदी निवड

'असे आहेत २ नवीन नियम" 

1. आता एका ओव्हरमध्ये बॉलर्सना फक्त 2 बाऊन्सरला मुभा

आता आयपीएलमध्ये बॉलर्सना एका ओव्हरमध्ये फक्त दोन बाऊन्सर टाकण्याची मुभा असेल. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये एकच बाऊन्सर टाकण्याचा नियम आहे. पण यावेळी आयपीएलमध्ये बदल करण्यात आले आहेत.

2. आता आयपीएलमध्ये स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम

यावेळी आयपीएलमधील सर्वाधिक चर्चेत असलेला नियम स्मार्ट रिव्ह्यू सिस्टम लागू करण्यात येणार आहे. या नियमामुळे अम्पायर्सना आपला निर्णय देताना मदत मिळणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आतापासून टीव्ही अम्पायर्स आणि हॉक-आय ऑपरेटर एकाच खोलीत बसतील. यामुळे टीव्ही अम्पायर्सना निर्णय देण्यात खूप मदत होईल. दरम्यान, आतापर्यंत टीव्ही अंपायर आणि हॉक-आय यांच्यामध्ये टीव्ही प्रसारण दिग्दर्शक खूप महत्त्वाचा होता. ब्रॉडकास्ट डायरेक्टर निर्णय देण्यासाठी हॉक-आयपासून टीव्ही अंपायरला सर्व फुटेज द्यायचा. पण आता टीव्ही ब्रॉडकास्ट डायरेक्टरची भूमिका संपणार आहे. नवीन नियमांनुसार, टीव्ही अम्पायर्सना अधिक फुटेज पाहण्याची सुविधा असेल, परंतु यापूर्वी हे शक्य नव्हते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group