अखेर 'ग्लेन मॅक्सवेल'चा मोठा निर्णय
अखेर 'ग्लेन मॅक्सवेल'चा मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
यंदाच्‍या इंडियन प्रीमीयर लीग ( IPL 2024 ) स्‍पर्धेत खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झालेल्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला मोठा धक्‍का बसला आहे. या संघातील ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने यंदाच्‍या IPL हंगामातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने अनिश्चित काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आरसीबीच्या पराभव झाला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान मॅक्सवेलने माध्‍यमांशी बोलताना ही माहिती दिली.

खराब फॉर्ममुळे मॅक्सवेलला या मोसमात खूप टीकेला सामोरे जावे लागले आहे. सनरायझर्सविरुद्धच्या सामन्‍यात त्‍याला संघात स्‍थान देण्‍यात आले नव्‍हते. प्लेइंग-11 मध्ये त्याच्या जागी विल जॅक याने स्थान मिळवले. सामन्यानंतर मॅक्सवेलने स्पष्ट केले की, त्याने स्वतः कर्णधार फाफ डुप्लेसिस याला आपल्‍या ऐवजी अन्‍य खेळाडूला संधी देण्‍याची विनंती केली होती.

‘मानसिक आणि शारीरिक विश्रांतीसाठी घेतला ब्रेक’

पत्रकार परिषदेत बोलताना मॅक्सवेलने सांगितले की, सध्या त्याची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे त्याने विश्रांतीच निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या सात सामन्यांतील सहाव्या पराभवानंतर मॅक्सवेल म्हणाला, “वैयक्तिकरित्या माझ्यासाठी हा खूप सोपा निर्णय होता. शेवटच्या सामन्यानंतर मी फाफ (डु प्लेसिस) आणि प्रशिक्षकाकडे गेलो. त्‍यांना सांगितले की, माझ्‍या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी संघात स्‍थान देण्‍याची वेळ आली आहे. तुम्ही खेळत राहू शकता आणि स्वतःला आणखी अंधारात ढकलू शकता. तथापि, मला असे वाटते की आता खरोखरच माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिक विश्रांती देण्याची संधी आहे. मला स्पर्धेदरम्यान खेळण्याची गरज असेल, तर मला आशा आहे की मी मजबूत मानसिक आणि शारीरिक स्थितीत परत येईन आणि प्रभाव पाडण्याचा प्रयत्‍न करेन.
इतर बातम्या
Join Whatsapp Group